करोना वाढतोच आहे, देशात रुग्ण संख्या दीड लाखांच्या वर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 27, 2020

करोना वाढतोच आहे, देशात रुग्ण संख्या दीड लाखांच्या वर

https://ift.tt/2LY6iyJ
नवी दिल्ली: देशातील विषाणूच्या संसर्गाची गती काही कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात एकूण १ लाख ५१ हजार ७६७ लोकांना करोनाची बाधा झाली आहे तर, यांपैकी ६४ हजार ४२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पर्यंत करोनामुळे एकूण ४ हजार ३३७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १७० रुग्णांचा मृत्यू गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६ हजार ३८७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १,७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडूत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ हजारांहून अधिक झाली आहे. तामिळनाडू, बिहारमध्ये तीव्र गतीने पसरतोय संसर्ग तामिळनाडूत करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली १७,७२८ वर. राज्यात करोनामुळे आतापर्यंत १२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच बिहार राज्यातही करोनाचे रुग्ण वाढले आहेत. बिहारमध्ये स्थलांतरित मजूर परतल्यानंतर राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या तीव्र गतीने वाढत आहे.