श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान आतापर्यंत झाले आहेत. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांलना मिळाली आहे. सोपोर पोलिस, २२ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या पूर्वी २३ जून या दिवशी पुलवामा येथील बांदजू भागात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहिमेअंतर्गत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या चकमकीदरम्यान सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. या चकमकीत २ दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर परिमंडळाचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली होती. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बांदजूमध्ये शोध मोहीम हाती घेतली होती. या बरोबरच, २१ जून या दिवशी जम्मू काश्मीरच्या कुलगाम आणि श्रीनगरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह एकूण ४ दहशतवादी ठार झाले होते. श्रीनगरच्या जादिबल भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. या वेळी सुरक्षदलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. वाचा: या दहशतवाद्यांचे नातेवाईक आणि समुदयाकडून ते शरण यावेत यासाठीही प्रयत्न केले गेले. मात्र, शरण येण्याऐवजी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवरही अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षादलांनी प्रत्युत्तर देताना गोळीबार सुरू केला आणि यात एकून तीन दहशतवादी ठार झाले. त्यानंतर या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. वाचा: गेल्या शनिवारी संध्याकाळी देखील कुलगाममध्ये सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत १ दहशतवादी मारला गेला. तैयब वहीद उर्फ इम्रान भाई अशी या मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आली. तो गाजी बाबा या नावानेही ओळखला जात होता. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी होता. वाचा: