मांडूळ, कासवाची तस्करी; 'हायप्रोफाइल' रॅकेटमध्ये ठाण्याचा पोलीस अधिकारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 15, 2020

मांडूळ, कासवाची तस्करी; 'हायप्रोफाइल' रॅकेटमध्ये ठाण्याचा पोलीस अधिकारी

https://ift.tt/2zCIMEU
नाशिक: मांडूळ आणि कासव तस्करीच्या प्रयत्नात असलेल्या १९ संशयितांना पूर्व वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात येवला येथून ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केली असता, तस्करीचे रॅकेट समोर आले आहे. मांडूळ आणि कासव तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. गेल्याच आठवड्यात येवला येथून काही संशयित ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, तस्करीच्या रॅकेटमध्ये पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारीही सामील असल्याची माहिती मिळाली. वनविभागाने १९ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे. ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षकासह पुणे येथील पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. तस्करीबाबत राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय तपासाकरिता पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांचे कॉल डिटेल्स घेण्यासाठी 'वाइल्ड लाइफ क्राईम सेल' मेळघाट टायगर रिझर्व्ह विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.