जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. स्थानिक बाजारात परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे निफ्टीची तेजी यापुढे कायम राहील, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांनी सांगितले. मंगळवारी अमेरिकन बाजारात घसरण झाली. अमेरिकेत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद शेअर बाजारांवर उमटले. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक आघाडीच्या तारे-तारकांना नृत्याचे धडे देणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर यांची प्रकृती खालावली आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत करोना रूग्णवाढीचा दर झपाट्याने खाली येत आहे. तसेच रूग्ण दुपटीचा कालावधीदेखील वाढू लागला आहे. मात्र त्याचवेळी मृत्यूदरात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. जूनच्या पंधरवड्यानंतर मुंबईतील मृत्यूदर वाढत असून तो पुन्हा साडेपाच टक्क्यांवर पोहोचला आहे. खासगी रूग्णालयांनी मागील दोन महिन्यांतील रूग्णमृत्यूची माहिती नुकतीच दिल्याने मृत्यूदर वाढला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मृत्यूदरात प्रत्यक्षात वाढ झालेली नाही, असा दावा पालिकेने केला आहे. 'राज्यात करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही', असे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. 'जुलै आणि ऑगस्टमध्ये करोनाची परिस्थिती कठीण होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी बंधने नीट पाळली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागू शकते', असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस कार्यकारिणीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. या मागणीला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. पुन्हा अध्यक्ष बनवण्याच्या मागणीवर राहुल गांधींनी मात्र मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये काल लष्करी स्तरावर १२ तासा चर्चा झाली. यात सीमेवरील तणाव कमी करण्यासह सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले. पण दुसरीकडे चीनकडून कुरघोडीचे काम सुरूच आहे. सीमेवर शांततेचा राग आळवणारा चीन भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांमुळे चिंतेत आहे. प्रोपगेंडा करणाऱ्या चीनच्या पीपल्स डेली वृत्तपत्राने रशियाला सल्ला दिला. भारताला संवेदनशील काळात शस्त्र विकू नये, असं चीनने म्हटलंय.