इस्रायलचा इराणवर हल्ला; एफ-३५ने क्षेपणास्त्र ठिकाणांवर बॉम्ब हल्ला! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 4, 2020

इस्रायलचा इराणवर हल्ला; एफ-३५ने क्षेपणास्त्र ठिकाणांवर बॉम्ब हल्ला!

https://ift.tt/2VLBbf0
तेहरान: आणि इराणमध्ये सायबर हल्ले तीव्र झाले आहेत. इस्रायलने सायबर हल्ला करत इराणच्या आण्विक केंद्राच्या दोन ठिकाणांवर दोन स्फोट घडवून आणले आहेत. त्यामध्ये एक युरेनियम संवर्धन केंद्र असून दुसरे ठिकाण क्षेपणास्त्रनिमिर्ती ठिकाण आहे. इतकंच नव्हे तर इस्रायलने आपल्या घातक एफ-३५ या लढाऊ विमानांच्या मदतीने इराणमधील पर्चिन या ठिकाणी क्षेपणास्त्र निर्मितीच्या ठिकाणी हल्ला केला असल्याचे वृत्त आहे. कुवेतमधील वृत्तपत्र 'अल जरीदा'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मागील आठवड्यात झाली आहे. इस्रायलच्या सायबर हल्ल्यामुळे गुरुवारी इराणच्या नतांज अणू संवर्धन केंद्रात आग लागली आणि जोरदार स्फोट झाले. हे केंद्र पूर्णपणे भूमिगत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर इराणला मोठा फटका बसला असून त्यांचा अणू कार्यक्रम दोन महिने मागे गेला आहे. वाचा: 'अल जरीदा'ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्यात शुक्रवारी इस्रायलच्या एफ-३५ स्टील्थ फायटर जेटने पर्चिन भागातील एक इराणी ठिकाणी हल्ला करत बॉम्ब फेकले होते. हे ठिकाण क्षेपणास्त्र निर्मिती ठिकाण समजले जाते. सातत्याने आपल्याकडील क्षेपणास्त्र आणि शस्त्रे अद्यावत करत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. ही शस्त्रे, क्षेपणास्त्रे इस्रायलविरोधी गटांना पुरवत होता. वाचा: इस्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल सरकारने या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला नाही. पंतप्रधान नेतन्याहू यांनीदेखील आपल्याला या विषयावर बोलयाचे नसल्याचे सांगितले असल्याचे वृत्त आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनीदेखील अणू ठिकाणांना लागलेल्या आगी 'अपघात' असल्याचे सांगितले. या घटनेची चौकशी सुरू असून हल्ला झाल्याचे समोर आल्यास प्रत्युत्तर दिले जाईल असेही इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. काही वृत्तानुसार, इराणने इस्रायलची पाणी पुरवठा करणारी यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला इस्रायलने परतवून लावला. इराणला यश आले असते तर, पाण्यात क्लोरीनचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढले असते आणि इस्रायलमध्ये पाणी संकट निर्माण झाले असते. वाचा: दरम्यान, मागील काही महिन्यांपासून इराण-अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इराण आपला अणवस्त्र कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावरूनही दोन्ही देशांमध्ये जुंपली आहे. जानेवारी महिन्यात ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणने याचा सूड घेण्याचा जाहीर केले होते. त्याशिवाय, इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात अमेरिकेचे अनेक सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. या तणावातूनच इराणकडून युक्रेनचे प्रवासी विमान पाडले गेले होते. सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखीच वाढला.