गुगल, फेसबुकनंतर मुकेश अंबानींची आता टिकटॉकवर नजर? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

गुगल, फेसबुकनंतर मुकेश अंबानींची आता टिकटॉकवर नजर?

https://ift.tt/31LyZ9A
नवी दिल्ली : चीनचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या वादात असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. कंपनी सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन यांच्यासोबत भारतातील हक्क विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हा करार झाल्यास टिकटॉकला भारतात मोठं वित्तीय पाठबळ मिळेल. केंद्र सरकारने चीनच्या ५८ अॅपसह लोकप्रिय टिकटॉकवरही बंद घातली होती. जुलै महिन्यातच दोन्ही कंपन्यांची चर्चा सुरू झाली असून अजून कोणताही निर्णय झालेला नाही. टेक क्रंचच्या रिपोर्टनुसार, ऑईलपासून ते रिटेलपर्यंत आपल्या व्यवसायाचा विस्तार केलेल्या रिलायन्सला टिकटॉकमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल. दोन्हीही कंपन्यांनी यावर अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. बंदीपूर्वी टिकटॉकचे भारतात २० कोटी युझर्स होते, तर मूल्य ३ बिलियन अमेरिकन डॉलर एवढं होतं. रिलायन्सकडे सध्या फेसबुक, गुगल यांसारखे दिग्गज गुंतवणूकदार आहेत. तर जिओकडे ४० कोटींहून अधिक युझर्स आहेत. त्यामुळे टिकटॉक आणि जिओ एकत्र आल्यास रिलायन्सला मुकेश अंबानी यांचं ध्येय असलेली तंत्रज्ञान आधारित कंपनी बनवण्यासाठी मोठी मदत होईल, असं जाणकार सांगतात. या करारात केंद्र सरकारच्या चिंतेचीही काळजी घेतली जाऊ शकते. चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत डेटा शेअर केल्याचा ठपका टिकटॉकवर आहे. नुकत्याच गुगलने केलेल्या ३३ हजार ७३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये १ लाख ५२ हजार ५६ कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली आहे. गुंतवणूकदारांमध्ये विस्टा, जनरल अटलँटिक, केकेआर, मुबाडाला, टीपीजी, एल कॅटरटॉन, इंटेल कॅपिटल, सिल्वर लेक, क्वालकॉम आणि फेसबुक यांचाही समावेश आहे. टिकटॉक हा प्लॅटफॉर्म बाईट डान्सच्या मालकीचा आहे. भारतीय कंपनीसोबत चर्चा सुरू असल्यामुळे कोणतीही कर्मचारी कपात होणार नसल्याचं आश्वासन कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना दिलं आहे. अमेरिकेतही टिकटॉक वादात आहे. १५ सप्टेंबरपर्यंत मायक्रोसॉफ्ट आणि टिकटॉक डील न झाल्यास टिकटॉकवर अमेरिकेत बंदी निश्चित आहे. मायक्रोसॉफ्टसोबत डील झाल्यास उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टिकटॉकला दिलासा मिळेल.