बनावट कंपन्यांद्वारे १ हजार कोटीचा हवाला; चीनी नागरिकांना भारतीयांची साथ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 12, 2020

बनावट कंपन्यांद्वारे १ हजार कोटीचा हवाला; चीनी नागरिकांना भारतीयांची साथ

https://ift.tt/3fQTLtp
नवी दिल्ली: मंगळवारी रात्री उशिरा मनी लॉन्ड्रिंगच्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला आहे. आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक हवालाच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे काही भारतीय लोकांना हाताशी धरून चीनी नागरिक बनावट कंपन्याच्या माध्यमातून केले जात होते. यात भारतीय बँकातील काही कर्मचारी सहभागी होते. वाचा- आयकर विभागाने मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवालाद्वारे व्यवहार सुरू होते. चीनी कंपन्यांच्या उपकंपन्या आणि संबंधित लोकांनी बनावट कंपन्यांच्या आधारे भारतात एक हजार कोटी रुपयांचे क्रेडिट घेतले आहे. यात कामात काही भारतीय कर्मचारी आणि सीए (चार्टर्ड अकाउंटंट) समावेश आहे. वाचा- चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून जवळपास ४० बँक खाती बनावट कंपन्यांच्या नावाने सुरू करण्यात आली. या खात्यांवर तब्बल १ हजार कोटी रुपयांचे क्रेडिट घेण्यात आले. वाचा- हवालाच्या व्यवहारात चौकशी करताना लक्षात आले की अमेरिकी डॉलर आणि हॉगकॉग मध्ये व्यवहार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका चायनीज कंपनीच्या उपकंपनीने एक हजार कोटी रुपये घेतले आहेत. हा पैसा रिटेल शो रुम आणि व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली घेण्यात आलाय. वाचा- आयकर विभागाने दिल्ली, गाझियाबाद, गुरुग्राम आदी २१ ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने अद्याप चिनी कंपन्यांची नावे जाहीर केली नाहीत. या कारवाईत विभागाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सुरुवातीच्या चौकशीच ३०० कोटी रुपयांचा हवाला झाल्याचे समोर आले. नंतर हा आकडा १ हजार कोटींवर गेला. या संदर्भात अधिक तपास केला असता चीनी नागरिकांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ४० हून अधिक बँक खाती सुरू केल्याचे समोर आले.