बापरे! लक्षण नसलेले १३ हजार करोना रुग्ण फिरताहेत मुंबईत! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

बापरे! लक्षण नसलेले १३ हजार करोना रुग्ण फिरताहेत मुंबईत!

https://ift.tt/3iEgR8u
मुंबई: मुंबईत करोनावर नियंत्रण आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी मुंबईत अजूनही करोनाचे लक्षणे नसलेले १३ हजार रुग्ण फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णांकडून इतरांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनिक 'नवभारत टाइम्स'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुंबईत ७८ टक्के रुग्णांनी करोनाला मात दिली आहे. तर १९७१८ रुग्णांपैकी १३ हजार २९२ रुग्णांमध्ये काहीही लक्षणे नाहीत. तर ५६५५ रुग्णांमध्ये करोनाचे लक्षणे आहेत. तर १०८५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आतापर्यंत ६८४२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाइडलाइन नुसार करोना लक्षण नसलेले तीन प्रकारचे रुग्ण असतात. यात लक्षणे नसलेले पण असिम्प्टोमॅटिक आहेत. दुसऱ्या प्रकारात लक्षणे नसलेले पण टेस्ट नंतर पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लक्षणे दिसू लागलेले रुग्ण येतात. तर तिसऱ्या प्रकारात अत्यंत सौम्य लक्षणे असलेल्या पण करोना झाला हे माहीतच नसलेल्या रुग्णांचा समावेश होतो. करोनाची लक्षणे नसलेल्या या १३ हजार रुग्णांना घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. मात्र, अनेक रुग्ण घरात थांबण्याऐवजी सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. महापालिकेने करोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चेस द व्हायरस ही मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क लोकांना तात्काळ क्वॉरंटाइन करण्यात येत होते. त्यांच्यावर गरजेनुसार तात्काळ उपचारही केले गेले. मुंबईत आतापर्यंत १ लाख २४ हजार ३२२ सापडलेले आहेत. त्यातील ९७९९३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईतील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर करोनाची सरासरी डेली ग्रोथ रेट ०.७९ टक्के राहिली आहे. त्यामुळे मुंबईचा करोना रुग्णांचा डबलिंग रेट ८८ दिवसावर पोहोचला आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुंबईतील कंटेन्मेंट झोनही ५८७ इतकेच राहिले आहेत. तर ५४८९ इमारतींना करोना रुग्ण सापडल्यानंतर सील करण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये ४०.६२ लाख लोक राहतात. या ठिकाणी ३०४१३ रुग्ण सापडले आहेत. तर सील इमारतीत ८.३० लाख लोक राहत असून या ठिकाणी २२०१४ रुग्ण सापडले आहेत.