मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी यांना जाहीरपणे झापल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते यांनी व्यक्त केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत शरद पवारांनी फटकारले हे वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले, असं सांगतानाच हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून होता?, असा सवाल निलेश राणे यांनी पवारांना केला आहे.