आजारातून उठल्यानंतर गृहमंत्री अमित शहा करणार 'या' राज्याचा दौरा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 2, 2020

आजारातून उठल्यानंतर गृहमंत्री अमित शहा करणार 'या' राज्याचा दौरा

https://ift.tt/3liK9eb
कोलकाता : केंद्रीय नुकतेच करोना संक्रमणातून बाहेर पडलेत. यानंतर लगेचच ते आपल्या राजकीय दौऱ्यांना सुरूवात करणार असल्याचं समजतंय. प्रकृती बरी झाल्यानंतर गृहमंत्री पहिल्यांदा ममता बॅनर्जींचा गड असलेल्या पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या महिन्याच्या शेवटी अमित शहा पश्चिम बंगालला भेट देऊन भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. बंगालमध्ये येत्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याच्या वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा करताना अमित शहा यांनी दूर्गापूजे अगोदर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं म्हटलंय. अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी युनिट सदस्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केली. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या म्हणण्यानुसार, दूर्गापूजा २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच शहा बंगलला भेट देतील आणि निवडणूक मोहिमेला सुरूवात करतील. वाचा : वाचा : भाजप प्रदेश युनिटकडून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनाही राज्यात येण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती दिलीप घोष यांनी दिलीय. याशिवाय राज्यातील पदाधिकारी राहुल सिन्हा यांनी बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांना नुकतंच राष्ट्रीय सचिव पदावरून बाजुला करण्यात आलंय. या बैठकीत कृषी कायद्याचे फायदे शेतकऱ्यांना कसे समजावून सांगता येतील, याविषयी चर्चा झाल्याचंही समजतंय. कृषी कायद्याच्या विरोधात राज्यात मुख्यमंत्री यांनी मोहीम सुरू केलीय. राज्यात कृषी कायदे लागू होणार नाहीत, असा निर्णय तृणमूल काँग्रेसनं घेतलाय. याचा फायदा ममतांना होऊ शकतो. त्यामुळेच, कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. वाचा : वाचा :