नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात २ ऑक्टोबर हा अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैंकी एक दिवस... आपले लाडके 'बापू', भारताचे जनक, स्वातंत्र्य सैनिक आणि यांचा हा जन्मदिवस... आज महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती आहे. हा दिवस जगभरात 'अहिंसा दिन' म्हणून ओळखला जातो. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदरमध्ये झाला होता. भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बापूंनी आपलं संपूर्ण आयुष्यच पणाला लावलं. अर्थात त्याकाळीही जहालमतवादी स्वातंत्र्य सैनिकांचा मार्ग बाजुला सारून बापुंनी शांतीच्या मार्गानं स्वातंत्र्याचं एक आंदोलन सुरूच ठेवलं. बापुंनी जगाला दिलेला 'सत्य' आणि 'अहिंसे'चा मार्ग आजच्या काळातही तितकाच सुसंगत ठरतो... सध्याच्या वातावरणात तर अहिंसेच्या मार्गाचं वेगळेपण ठसठशीतपणे समोर येतं आणि म्हणूनच आजही बापूंचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान वादातीत आहे . स्वातंत्र्ययुद्धात बापुंचा शांतीचा मार्ग अनेकांना भावला आणि ते बापुंसोबत या आंदोलनात जोडले गेले. या मार्गानं चळवळीची शक्ती आणि क्षमता आणखीनच वाढली. आजही केवळ भारत नाही तर जगात बापूंची शिकवण प्रेरणादायी ठरतेय. तुमच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना या दिवसाच्या शुभेच्छा तुम्हालाही नक्कीच द्यायच्या असतील... बापूंच्या विचाराशिवाय यासाठी आणखी प्रेरणादायी काय ठरू शकतं. अशा व्यक्त करा तुमच्या शुभेच्छा रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान गांधी जयंतीच्या शुभेच्छा! विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली... मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहिनांसाठी त्याने काय फरक पडणार?- महात्मा गांधी खादी माझी शान, कर्मच माझी पूजा खरेपणा माझं कर्म आणि हिंदुस्तान माझा जीव आहे गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हजारो लोकांद्वारे काही शेकडोंची हत्या हे काही बहादुरीचं काम नाही, हे तर भेकडपणापेक्षाही खालच्या दर्जाचं आहे, हे कोणत्याही राष्ट्रवाद आणि धर्माच्या विरुद्ध आहे - महात्मा गांधी देवाला कोणताही धर्म नसतो - महात्मा गांधी अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, पण असे एकही ध्येय ननाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन- महात्मा गांधीअधिक वाचा :