भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: कधी आणि कुठे पाहाल पहिला वनडे सामना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 26, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: कधी आणि कुठे पाहाल पहिला वनडे सामना

https://ift.tt/365eec3
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे सिडनी क्रिकेट मैदानावर उद्या म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. पण घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया देखील मजबूत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील ही लढत भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याचा नाणेफेक ८ वाजून ४० मिनिटांनी होईल. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ वनडे, टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेतील पहिली लढत २७, दुसरी लढत २९ नोव्हेंबर रोजी तर तिसरी आणि अखेरची लढत २ डिसेंबर रोजी होणार आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिकेची सुरूवात ४ डिसेंबरपासून सुरू होईल. दुसरी लढत ६ तर तिसरी लढत ८ डिसेंबर रोजी होईल. त्यानंतर १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत डे-नाइट असेल. दुसरी कसोटी २६, तिसरी कसोटी ७ जानेवारी तर चौथी कसोटी १५ जानेवारीपासून खेळली जाईल. जाणून घ्या भारत दौऱ्याचे सामने कधी आणि कुठे Live पाहाल... वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाणून घ्या आणि हे सामने कुठे पाहाल.... वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरू होतील) वाचा- --- टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी (हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरू होतील) --- सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी --- कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा ( पहिली डे नाइट कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता. सुरु होईल. तर अन्य तीन सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
  1. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका कधी होणार आहे?AUS vs IND यांच्यातील वनडे मालिका २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होणार आहे
  2. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे कधी होणार आहे?AUS vs IND यांच्यातील पहिली वनडे २७ नोव्हेंबर रोजी होईल.
  3. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे कोणत्या मैदानावर होणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे सिडनी क्रिकेट मैदानावर होईल.
  4. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे किती वाजता सुरू होणार?पहिली वनडे भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी होईल तर नाणेफेक ८ वाजून ४० मिनिटांनी होईल.
  5. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील पहिल्या वनडेचे लाइव्ह अपडेट कुठे पाहाल?भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.