'निवार'ची तमिळनाडू-पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 26, 2020

'निवार'ची तमिळनाडू-पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू

https://ift.tt/3q6cyHA
चेन्नई : गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी झाला आहे. परंतु, तटीय भागांत जोराच्या वाऱ्यासोबत सुरू आहे. पद्दुच्चेरी, कराईकल, नागापट्टनम आणि चेन्नईमध्ये कालपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे अधिकांश भागात पाणी भरलंय. निवार चक्रीवादळाच्या तमिळनाडू आणि भागातील स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यासंबंधि तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी तसेच पुद्दुच्चेरीचे मुख्यमत्री व्ही नारायणस्वामी यांच्याशी संवाद साधून केंद्राकडून शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. एनडीआरएफच्या अनेक टीम्स जनतेला मदत करण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलीय. वाचा : वाचा : दरम्यान, हवामान विभागाकडून चेन्नईसहीत अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मच्छिमारांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर चक्रीवादळाचा फटका फारसा झाला नसल्याचं तमिळनाडूच्या वल्लूपूरम जिल्ह्यातील मच्छिमारांनी म्हटलंय. अतितीव्र शक्तिशाली 'निवार' चक्रीवादळ किनाऱ्याला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती हवामान खात्याकडून बुधवारी रात्री उशिरा देण्यात आली होती. हे वादळ कड्डलोरच्या किनाऱ्यापासून पूर्व-आग्नेय दिशेला ४५० किमीवर, तर पुद्दुचेरीपासून पूर्व-आग्नेयेला ५० किमीवर असल्याचं सांगण्यात आलं होतं. 'निवार' चक्रीवादळ किनारपट्टी जवळ येत असताना बुधवारी दिवसभर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. चेन्नईमध्ये संध्याकाळी सखल भागांमध्ये पाणी साठू लागल्यामुळे 'एनडीआरएफ'नं अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. सुरक्षेची खबरदारी म्हणून तमिळनाडू प्रशासनातर्फे किनारपट्टीवरील १ लाख २० हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. मुसळधार पावसामुळे बुधवारी दुपारपासूनच किनारपट्टीजवळील जनजीवन ठप्प झालं होतं. चेन्नई विमानतळ आज सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं. वाचा : वाचा :