
पाटणा : च्या रणांगणात आज पुन्हा एकदा खुद्द पतंप्रधान नरेंद्र मोदी दाखल होत आहेत. एनडीएच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारच्या सुट्टीचा दिवसाचा मुहूर्त साधलाय. आज मोदी बिहारमध्ये चार जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा राज्यातील तिसरा आहे. भाजपच्या प्रदेश मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान रविवारी छपरा, समस्तीपूर, मोतिहारी आणि बगहा या ठिकाणी सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोशल मीडियाद्वारे आपल्या दौऱ्याची माहिती दिलीय. 'उद्या रविवारी बिहारच्या जनतेत उपस्थित राहणार आहे. लोकशाहीच्या या महापर्वात छपरा, समस्तीपूर, मोतिहारी आणि बगहामध्ये जाहीर सभांत जनता-जनार्दनाचा आशीर्वाद घेणार आहे' असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय. वाचा : वाचा : आपल्या या दौऱ्याची सुरुवात पंतप्रधान मोदी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख यांचा राजकीय गड असलेल्या छपरामधून करणार आहेत. छपरानंतर ते समस्तीपूरला दाखल होतील. इथे एका हाऊसिंग बोर्डाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनसभेला ते संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी मोतिहारीच्या गांधी मैदानात आणि बगहाच्या बाबा भूतनाथ महाविद्यालयाच्या मैदानात जनसभेला संबोधित करतील. दरम्यान, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान २८ ऑक्टोबर रोजी पार पडलंय. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान ३ नोव्हेंबर तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान २३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा समावेश आहे तर तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. १० नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. वाचा : वाचा :