
पाटणा : आज बिहारच्या छपरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसभेला संबोधित करत आहेत. या सभेत नरेंद्र मोदींनी बिहारच्या जनतेला मतांसाठी साद घालताना जनतेचं कौतुक केलंय. 'सकाळी १०.०० वाजता एवढी मोठी सभा कधीही संभव होऊ शकली नव्हती. हे अद्भूत दृश्यं आहे. बिहारच्या जनतेचा उत्साह पाहण्यासारख आहे. पहिल्याच टप्प्यातील मतदानातून नितीन बाबूंच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार पुन्हा सत्तेत येणार असंच दिसतंय. पहिल्याच टप्प्यातील मतदानात तुम्ही एनडीएला मोठ्या संख्येनं दिलेल्या समर्थनाचे संकेत दिले. ज्यांनीही यासाठी मतदान केलं, त्यांचे मी आभार मानतो' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा राज्यातील तिसरा आहे. आज मोदी बिहारमध्ये चार जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. आपल्या या दौऱ्याची सुरुवात पंतप्रधान मोदी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख यांचा राजकीय गड असलेल्या छपरामधून करत आहेत. छपरानंतर ते समस्तीपूरला दाखल होतील. इथे एका हाऊसिंग बोर्डाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनसभेला ते संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी मोतिहारीच्या गांधी मैदानात आणि बगहाच्या बाबा भूतनाथ महाविद्यालयाच्या मैदानात जनसभेला संबोधित करतील. वाचा : वाचा :