
नवी दिल्ली : करोनाच्या रुग्णांची संख्या आता ८२ लाखांच्या जवळपास पोहचली आहे. दिलासादायक म्हणजे, यातील देशातल्या ७४ लाख ९१ हजार ५१३ रुग्णांनी एव्हाना करोनावर मात केलीय. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोना संक्रमितांची एकूण संख्या ८१ लाख ८४ हजार ०८२ वर पोहचलीय. गेल्या २४ तासांत (शनिवारी सकाळी ८.०० पासून रविवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) करोनाचे ४६ हजार ९६३ नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत तब्बल ५८ हजार ६८४ रुग्णांनी करोनावर मात केल्याचंही दिसून येतंय. तर शनिवारी ४७० जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. उल्लेखनीय म्हणजे, ७ जुनैनंतर एका दिवसात हा सर्वात कमी मृत्यूचा आकडा आहे. आत्तापर्यंत देशात १ लाख २२ हजार १११ जणांना कोविड १९ मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. वाचा : वाचा : देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी आहे. २ ऑगस्टनंतर भारतात पहिल्यांदाच ही संख्या इतकी खाली आलेली दिसतेय. सध्या देशात ५ लाख ७० हजार ४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशाचा (बरे झालेले रुग्ण) ९१.५३ वर पोहचलाय. पॉझिटिव्हीटी रेट (चाचणीत एकूण नमुन्यांपैंकी संक्रमित आढळलेले रुग्ण) ४.३ क्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.४९ टक्क्यांवर आहे. ३१ ऑक्टोबर रोजी १० लाख ९१ हजार २३९ करोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १० कोटी ९८ लाख ८७ हजार ३०३ नमुन्यांची तपासणी पार पडल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आलीय. वाचा : वाचा :