बायडन-ट्रम्प संघर्ष चिघळणार? 'ही' माहिती देण्यास बायडन यांचा नकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

बायडन-ट्रम्प संघर्ष चिघळणार? 'ही' माहिती देण्यास बायडन यांचा नकार

https://ift.tt/2MKXSOZ
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडनव माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष नव्याने उफाळण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचा स्वभाव अतिशय अस्थिर असल्याने माजी अध्यक्ष या नात्याने त्यांना देशाची गोपनीय माहिती देण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्टोक्ती बायडन यांनी केली आहे. ‘सीबीएस इव्हनिंग न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली. ही मुलाखत रविवारी प्रसारित होणार आहे. शुक्रवारी या मुलाखतीचे काही अंश प्रसारित झाले. गुप्तचर विभागाकडून मिळालेली अथवा अन्य गोपनीय माहिती कार्यकाळ पूर्ण केलेल्या माजी अध्यक्षांना देण्याची अमेरिकेत पूर्वापार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर बायडनयांनी हे विधान केले. याविषयीचा माझा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. ट्रम्प यांना या प्रकारची माहिती देण्याची गरज नाही, असे मला वाटते. त्यांना गोपनीय माहिती देऊन काय साध्य होईल? उलटपक्षी प्रसंगी त्यांचा अस्थिर स्वभाव पाहता त्यांची जीभ कधीही घसरू शकेल व महत्त्वाची माहिती ते कुठेही बोलून मोकळे होतील, असे परखड मतप्रदर्शन बायडनयांनी केले. वाचा: ट्रम्प यांना गोपनीय माहिती पुरवली जावी की नाही याविषयी सध्या विचार केला जात आहे, असे व्हाइट हाउसचे प्रसिद्धी सचिव जेन सॅकी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीस म्हटले होते. वाचा: अशीही ख्याती? गुप्तचर विभागाकडून मिळालेली माहिती अध्यक्षांना रोज लिखित स्वरूपात सादर केली जाते. मात्र ही माहिती पूर्णपणे अथवा नियमित वाचणारे अध्यक्ष अशी ट्रम्प यांची कधीच ख्याती नव्हती, असे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.