उत्तराखंडात जोशीमठाजवळ हिमकडा कोसळला, पूरसदृश्य परिस्थिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

उत्तराखंडात जोशीमठाजवळ हिमकडा कोसळला, पूरसदृश्य परिस्थिती

https://ift.tt/3oXwwSI
जोशीमठ, : उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा प्रोजेक्टवर हिमकडा कोसळल्यानंतर प्रकल्पाला मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. तपोवनमध्ये चमोली हायड्रो पॉवर प्रोजेक्टचा बांधाला यामुळे फटका बसलाय. यामुळे, भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालीय. अचानक आलेल्या पाण्याच्या लाटेत अनेक स्थानिक रहिवासी वाहून गेल्याचंही समजतंय. चमोली जिल्ह्यातील तपोवन भागातील रेणी गावात एका वीज प्रकल्पाजवळ अचानक झाल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. धौलीगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावांत राहणाऱ्या रहिवाशांना तत्काळ बाहेर काढण्याचे निर्देश चमोली जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. घटनेची सूचना मिळताच प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बचावकार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.