करोनामुळे राज्याला मोठा फटका; अजितदादांनी 'आकडा' सांगितला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 8, 2021

करोनामुळे राज्याला मोठा फटका; अजितदादांनी 'आकडा' सांगितला

https://ift.tt/3aHD9DL
म.टा. विशेष प्रतिनिधी, करोना संकटामुळे राज्यातील सरकारी तिजोरीला सुमारे ७५ कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्राने जीएसटीचे २५ हजार कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. सुमारे एक लाख कोटी रुपये कमी होण्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना तारेवरची कसरत करावी लागेल, अशी प्रांजळ कबुली उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी दिली. 'पेट्रोलचे भाव शंभर रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, राज्याचे कर कमी करण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल', असेही त्यांनी स्पष्ट केले. ( on State Budget 2021) अर्थसंकल्प पूर्वबैठका व संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार यांचे प्रदीर्घ काळानंतर उपराजधानीत रविवारी दुपारी आगमन झाले. पत्रकार संघाच्या 'मीट द प्रेस'मध्ये बोलताना केंद्र, राज्य, महाआघाडी व विरोधी पक्षाशी संबंधित प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. वाचा: राज्याच्या साडेचार लाख अपेक्षित उत्पन्नापैकी ७५ हजार कोटी रुपये कमी होण्याचा अंदाज आहे. केंद्राने 'वन नेशन वन टॅक्स' असा शब्द संसदेत दिल्यानंतरही राज्याचे २५ हजार कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत, याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, 'दीड लाख कोटी रुपये वेतन, निवृत्तीवेतनावर खर्च होतात. पोलाद, सिमेंटचे भाव प्रचंड वाढल्याचा फटका ग्रामविकास, बांधकाम विभागाला बसला. सरकारने आर्थिक भारानंतरही आरोग्य, गृह, नागरी पुरवठा, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदारांच्या निधीत कपात केलेली नाही.' विश्वास बसेल असे बोला! साखर कारखाने अडचणीत आणल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी आघाडीच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांची यादीच सांगून 'हे तुम्हालाच पटते का', असा उलट सवाल केला. जनतेचा विश्वास बसेल, लोकांना पटेल असे बोलावे, असा टोलाही उपमुख्यमंत्र्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली, हे शहा यांचे वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. त्यांच्यातच चर्चा झाली होती, अशी कोटी पवार यांनी केली. करांचा फेरविचार 'पेट्रोल-डिझेलवरील राज्याचे कर कमी करण्याबाबत महाआघाडीच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. आताच काही बोललो तर, अर्थसंकल्प फोडला म्हणून सर्व अंगावर येतील. अर्थमंत्री म्हणून दिशा ठरवलेली आहे', असे सांगून अजित पवार यांनी करांबाबत फेरविचार होण्याचे संकेत दिले. वाचा: