अनैतिक संबंधांच्या संशयावरून भररस्त्यात पत्नीची केली हत्या, लोक व्हिडिओ काढत होते - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 28, 2021

अनैतिक संबंधांच्या संशयावरून भररस्त्यात पत्नीची केली हत्या, लोक व्हिडिओ काढत होते

https://ift.tt/3r1JwZH
लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये पतीने आपल्या पत्नीची भररस्त्यात हत्या केली. तिचे असल्याचा संशय त्याला होता. त्याने रस्त्यावरच तिच्यावर चाकूने वार केले. महिला रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनास्थळी असलेले लोक या घटनेचे चित्रण मोबाइलमध्ये करत होते. पण कुणीही तिला रुग्णालयात नेण्यासाठी पुढे आले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत घोषित केले. येथील मडियांव परिसरातील प्रीती नगरात ही घटना घडली. रफीक याने आपली पत्नी अफसाना हिच्यावर चाकूने वार केले. ती रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिथे असलेल्या लोकांनी तिचा व्हिडिओ मोबाइलवर काढला. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. रफीकने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध होते. तिला अनेकदा समजावून सांगितले होते. तिला गावी जाऊ असेही सांगितले. पण तिने काहीही ऐकले नाही. तलाकही देत नव्हती. असाच तडफडून मरशील असे ती म्हणाली होती, असे रफीकने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सांगितले की, पतीने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपीला अटक केली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. आरोपीची चौकशी केली जात आहे.