नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळले; उपचारादरम्यान मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळले; उपचारादरम्यान मृत्यू

https://ift.tt/2YVA4KE
म. टा. वृत्तसेवा, डहाणू चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन नौदल अधिकारी (२७, रा. झारखंड, रांची) यांना शुक्रवारी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी दुबे यांना आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. भारतीय नौदलात २००१मध्ये सीबिंग सी-मॅनपदी रूजू झालेले दुबे ३१ जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहोचले. तेथे तीन अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना तीन दिवस चेन्नईला अज्ञातस्थळी कोंडून ठेवून दहा लाख रुपयांची मागणी केली. मात्र, दुबे यांनी नकार दिल्यानंतर कारमधून पाच फेब्रुवारीला महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणण्यात आले. तिथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. दुपारच्या सुमारास जंगलात होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यानंतर स्थानिकांनी घोलवड पोलिस चौकीला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ दुबे यांना डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध घोलवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास प्रभारी अधिकारी कुंभार करीत आहेत.