
मुंबई- दिल्लीच्या सीमेवर अजूनही सुरु असून देशभरातून नागरिकांचं समर्थन मिळाल्यानंतर त्यांना परदेशातूनही कलाकारांचा पाठिंबा मिळाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हॉलिवूड पॉप स्टार ने आपल्या ट्विटमधून समर्थन दर्शवलं. त्यावर बॉलीवूड अभिनेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि बाहेरच्या कलाकारांनी यात बोलू नये, असंही तिला सांगितलं गेलं. आता शेतकरी आंदोलनातील मुख्य नेते राजेश टिकैत यांनीही रिहानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिहानाने समर्थन दिल्यानंतर देशातील वातावरण अचानक बदलल्याने राजेश यांनी आपलं मत मांडलं. रिहाना तुमचं काही घेऊन जाणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. टिकैत म्हणतात, 'मला रिहाना कोण आहे, कुठली आहे हे माहीत नाही. परंतु, एखादा परदेशी कलाकार जर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर तो तुमच्याकडून काही घेऊन जाणार नाहीये.' रिहानाच्या ट्विटनंतर मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पंजाबी गायक दिलजीत दोसांज याने रिहाना वर गाणंही तयार केलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या गोष्टीचा विरोध केला. अक्षय कुमार, अजय देवगण, कंगना रणौत यासोबत करण जोहर, सानिया नेहवाल यांनीही ट्विट करून त्यांचा विरोध दर्शविला. यागोष्टीवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले. भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांनीही आम्ही सरकारसोबत आहोत आणि सर्व अडचणींचा सामना करण्यासाठी खंबीर आहोत, अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे टिकैत यांनी रिहानाची पाठराखण केली असून शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनासाठी तयार असल्याची ग्वाही दिली.