जणू अप्सराच! सायली संजीवच्या सौंदर्याची प्रेक्षकांना पडली भुरळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 14, 2021

जणू अप्सराच! सायली संजीवच्या सौंदर्याची प्रेक्षकांना पडली भुरळ

https://ift.tt/3eD873w
मुंबई- 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सायलीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. तिने तिच्या सहज सुंदर हावभावांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवला. तिने छोट्या पडद्यावर तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. सायली तिथेच थांबली नाही तर तिने मराठी चित्रपटसृष्टीदेखील गाजवायला सुरुवात केली. नुसत्या नजरेने कित्येकांना घायाळ करणारी सायली आज प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सायलीचा मोठ्या पडद्यावरही एक वेगळाप्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. छोट्या पडद्याप्रमाणे मोठा पडदाही दिमाखात गाजवणाऱ्या सायलीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून चाहत्यांनी सायलीचं प्रचंड कौतुक केलं आहे. थोड्याच वेळात ते फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. सायली सध्या 'शुभमंगल ऑनलाईन' या कलर्स मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ती त्यात शर्वरीचं पात्र साकारत आहे. कलर्स मराठीचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी सायलीने खास आऊटफिट परिधान केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला ज्यावर सोनेरी रंगाचं नक्षीकाम केलं होतं. या कपड्यांमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. या कपड्यांवरील फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आणि बघताबघता तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडू लागला. तिची मोहक अदा पाहून प्रेक्षक अक्षरशः तिच्या प्रेमात पडले आहेत. सायली नुकतीच 'बस्ता' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यात तिने एका गावाकडच्या साध्या आणि सोज्वळ मुलीची भूमिका साकारली होती. जिच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सायलीचा 'झिम्मा' हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील सायलीच्या बोल्ड सीनचीदेखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.