पुणे : सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 23, 2021

पुणे : सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

https://ift.tt/3lE5i3M
म. टा. प्रतिनिधी, 'कमी शिकलेली आहेस. तुझी बायको होण्याची लायकी नाही,' असे म्हणत पत्नीचा छळ केल्याने तिने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता अनिल व्हावळे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती अनिल व्हावळे, पद्मिनी व्हावळे, अनिल व्हावळे, कल्पना व्हावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता आणि अनिल यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर अनिल व संगीता आंबेगाव बुद्रुक येथील ओव्हिनिअर सोसायटीत राहत होते. आरोपी अनिल याने लग्नानंतर काही दिवसांनी पत्नी संगीताला 'तू कमी शिकलेली आहेस. तुझी बायको होण्याची लायकी नाही. तू तुरुंगात जाऊन आलेली आहेस,' असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ केला. आरोपींच्या सततच्या छळास कंटाळून संगीताने २० मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत.