जगातील सर्वात महागड्या औषधाला ब्रिटनची मंजुरी; 'एवढी' आहे किंमत! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 9, 2021

जगातील सर्वात महागड्या औषधाला ब्रिटनची मंजुरी; 'एवढी' आहे किंमत!

https://ift.tt/38q9Oxs
लंडन: ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएस) दुर्मिळ अनुवांशिक आजारावर प्रभावी ठरणाऱ्या औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध जगातील सर्वात महागडे आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे १८ कोटी रुपये आहे. एनएचएस इंग्लंडने सोमवारी ही माहिती दिली. (एसएमए-Spinal Muscular Atrophy ) हा दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना या औषधाची आवश्यकता भासते. या आजारावरील उपचार जगातील सर्वात महागडा उपचार असल्याचे म्हटले जाते. या आजाराच्या रुग्णासाठी जगातील सर्वात महागडे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत १.७९ दशलक्ष पौंड (१८ कोटी रुपये) आहे. नोवार्टिस जीन थेरेपी या कंपनीने 'झोल्गेन्स्मा' हे औषध विकसित केले आहे. वाचा: नुकत्याच समोर आलेल्या डेटानुसार, झोल्गेन्स्मा हे 'टाइप १ एसएमए' आजारावर प्रभावी ठरत आहे. लहान मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांचे आयुष्यही वाढवत असल्याचे समोर आले. एनएचएस इंग्लंडचे मुख्य कार्यकारी सर सायमन स्टीव्हन्स यांनी सांगितले की, हा दुर्मिळ क्रूर आजार असलेल्या बालकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकप्रकारचे वरदान आहे. काय आहे हा आजार? जेनेटिक स्पाइनल मस्क्यूलर अट्रोफी () अर्थात एसएमए आजार शरीरात एसएमएन-१ या जनुकाच्या कमतरतेमुळे होतो. आजारामुळे छातीतील मांसपेशी कमकुवत होऊ लागतात. त्याशिवाय श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार लहान मुलांना होतो. वयानुसार त्रास वाढू लागतो आणि रुग्णाचा यामध्ये मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी जवळपास ६० मुले या आजारासह जन्म घेतात.