धावत्या बसमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड; विरोध केल्यानंतर तरुणाने... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 5, 2021

धावत्या बसमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड; विरोध केल्यानंतर तरुणाने...

https://ift.tt/2MOO2fd
नवी दिल्ली: नवी दिल्लीतील परिसरात धावत्या बसमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीला विरोध केला असता, त्याने तिच्या डोक्यात हेल्मेटने प्रहार केले. त्यानंतर बसमधून उतरला. पीडित महिला कॉन्स्टेबल यात जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबलने त्याला विरोध केला असता, त्याने हेल्मेट डोक्यात घालून तिला जखमी केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पोलिसांना या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाली. महिला कॉन्स्टेबलने या घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. तिच्या पतीने घटनेनंतर दुसऱ्या दिवशी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पीडित महिला द्वारका परिसरात राहते. ती सध्या पीसीआर युनिटमध्ये कार्यरत आहे. ती घटनेच्या दिवशी दुपारी कार्यालयात जाण्यासाठी द्वारका येथे बसची वाट बघत होती. ती बसमध्ये चढली. बस सुरू झाल्यानंतर एका तरुणाने तिची छेड काढली. पीडितेने त्याला विरोध केला. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पीडितेने पोलिसांत तक्रार करेन असे त्याला बजावून सांगितले. त्यावर आरोपीला राग आला. त्याने महिला पोलिसावर हेल्मेटने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो तरुण बसमधून उतरून पसार झाला. बसमधील इतरांनी पीडितेला डीडीयू रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा तपास सुरू आहे. तरुणाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.