फडणवीसांनी घेतली भागवतांची भेट; 'ऑपरेशन लोटस'ला मिळतेय गती? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 12, 2021

फडणवीसांनी घेतली भागवतांची भेट; 'ऑपरेशन लोटस'ला मिळतेय गती?

https://ift.tt/3tazTZ3
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २४ तासांच्या आतच विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सरसंघचालक डॉ. यांची नागपुरात भेट घेतली. तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. यावरून सत्ता परिवर्तनाच्या चर्चेला उधाण आले आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फडणवीस व पाटील यांच्या नागपूर दौऱ्याची कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे उभय नेते संघभूमीत असल्याचे कळताच सगळे अचंबित झाले. सकाळी मुंबईहून आगमन झाल्यानंतर उभय नेत्यांनी थेट महालातील संघ मुख्यालयात गाठले. आधी सरसंघचालकांची भेट घेऊन नंतर सरकार्यवाहांशी त्यांनी चर्चा केली. साधारणत: अर्धा तास चाललेल्या चर्चेत राज्यातील राजकीय स्थितीसह विविध विषयांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र, फडणवीस व पाटील यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. फडणवीस व पाटील यांनी संघ मुख्यालयाला भेट देताच भाजपचा मुहूर्त, मध्यावधी निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली. संघाची प्रतिनिधी सभा पुढच्या आठवड्याच्या अखेरीस बेंगळुरू येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची संघ मुख्यालयाला भेट आगामी वाटचालीचे संकेत देणारी असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून सत्तापरिवर्तनाची चर्चा सातत्याने चालली आहे. त्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेदेखील चर्चेत आले. त्यामुळे आता परत हवा तयार होऊ लागली आहे. संघ मुख्यालयातून निघताच पाटील मुंबईला तर फडणवीस मूलला रवाना झाले. तत्पूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर परत तोफ डागली. सेनेच्या मुखपत्रात आमची घेतलेली दखल घाव वर्मी लागल्याचे अधोरेखित करते, असे ते म्हणाले. आता महाराष्ट्राचा नंबर : मुनगंटीवार 'भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राज्याचा नंबर आहे', असे सूचक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात परत उलटसुलट चर्चा सुरू झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य 'मिशन'चे संकेत देणारे आहे का, यावरून तर्कवितर्क लावणे सुरू झाले. तीन पक्षांनी एकत्र येत बेईमानीने सत्ता स्थापन केली. अशा या लोकहितविरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. येत्या चार महिन्यांत भाजपची परत सत्ता येईल, असा दावा मुनगंटीवारांनी विमानतळावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.