'मोदी..मोदी' च्या घोषणा देत प्रवाशाचा राडा!; विमानाचे एमर्जन्सी लँडिंग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 8, 2021

'मोदी..मोदी' च्या घोषणा देत प्रवाशाचा राडा!; विमानाचे एमर्जन्सी लँडिंग

https://ift.tt/3ejfI7i
पॅरिस: घानाहून पॅरिसमार्गे नवी दिल्लीकडे येणाऱ्या एअर फ्रान्सच्या विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. एका भारतीय प्रवाशाने विमानात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे ही एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. यावेळी त्या भारतीय प्रवाशाने विमानाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली असल्याचे म्हटले जात आहे. बल्गेरियाची राजधानी सोफिया शहरात लँडिंग करण्यात आले. बल्गेरियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या भारतीय प्रवाशाला ७२ तासांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रवाशाची चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी शनिवारी दिली. या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर विमानाने पुढील प्रवासासाठी उड्डाण केले. वाचा: या प्रवाशावर विमानाची सुरक्षिता धोक्यात आणली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात हा प्रवाशी दोषी आढळल्यास त्याला पाच ते १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या प्रवाशाच्या कायदेशीर मदतीसाठी दुभाषी आणि कोर्टाने नियुक्त केलेला वकील देण्याता आला आहे. त्याशिवाय भारतीय दूतावासालाही त्याची माहिती देण्यात आली आहे. वाचा: वाचा: राडा नेमका कशामुळे? सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या भारतीय प्रवाशाचे आणि पंजाबी प्रवाशांसोबत वाद झाला असल्याचा दावा करण्यात सोशल मीडियावरील दाव्यानुसार, भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी या वादाला होती. वाद घालणाऱ्या भारतीय प्रवाशाने विमानात मोदी...मोदी...च्या घोषणाही दिल्या. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला शांत राहण्याची विनंती केली होती. मात्र, विनंती धुडकावून लावत त्याने पंजाबी व्यक्तीला उद्देशून आणखी भाष्य केले. अखेर कर्मचाऱ्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमान कर्मचाऱ्यांनादेखील भारतीय प्रवशाने धक्काबुक्की केली. या गोंधळात विमानाचे एर्मजन्सी लँडिंग करण्यात आले.