जसप्रीत- अनुपमाच्या लग्नावर अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 8, 2021

जसप्रीत- अनुपमाच्या लग्नावर अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा

https://ift.tt/3efz2lO
मुंबई- काही दिवसांपासून लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री परमेश्वरनच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सोबत अनुपमा लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकतील असं बोललं जात होतं. परंतु, आता या चर्चांवर अनुपमाच्या आईने पूर्णविराम लावला आहे. यापूर्वीही अनेकदा जसप्रीत आणि अनुपमा यांचं नाव जोडलं गेलं. ते दोघे याचं आठवड्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. अनुपमाने नेहमीच या चर्चां चुकीच्या असल्याचं म्हटलं तरीही त्यांच्याबद्दलच्या चर्चा सुरूच राहिल्या. आता अनुपमाच्या आईने या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. अनुपमाच्या आईचं म्हणणं आहे की, ज्यावेळेस प्रेक्षक अनुपमाला विसरतात त्याच वेळेस एक नवीन कहाणी त्यांच्यासमोर येते. या सगळ्या चर्चांकडे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने पाहिलंय आणि यापुढेही पाहत राहू. यापूर्वीही चर्चा सुरू होत्या. त्यांच्यामते या बातम्या ते लोक बनवतात ज्यांना एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करायला आवडतं. एकदा बुमराह ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्याच हॉटेलमध्ये अनुपमा कामासाठी थांबली होती. तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले होते. मला कळत नाही की लोक अशा चर्चा आता का करत आहेत? यावरुन अनुपमा आणि बुमराह यांच्या लग्नाच्या चर्चा खोट्या आहेत हे सिद्ध होतं. अनुपमा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरात येथे आहे. तिने सोशल मीडियावर तिथले काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. परंतु, बुमराहच्या अचानक सुट्टी घेण्याने त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यातून घरगुती कारण सांगत माघार घेतली होती. अनुपमा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाजलेलं नाव आहे. अनुपमाने तेलगू आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं आहे.