मित्राच्या मदतीसाठी आमिर खानने अर्ध्यावर सोडला सिनेमा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 5, 2021

मित्राच्या मदतीसाठी आमिर खानने अर्ध्यावर सोडला सिनेमा

https://ift.tt/30cfvKT
मुंबई- बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो जितका सुंदर अभिनय करतो, तितकचं सुंदर त्याच मनही आहे. तो आपली माणसं आणि मित्र जपण्यावर जास्त भर देतो. आमिर मित्रत्वाला कसा जागतो याची एक झालक दाखवली आहे. तो त्याच्या मित्रांना किती जपतो याची जाणीव या प्रसंगातून होते. आमिरचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या अमीन हाजीने आमिरजवळ एका गोष्टीची मागणी केली आणि त्यानेही वेळ न दवडता ती पूर्ण देखील केली. आमिरने मित्रासाठी स्वतःच्या चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर थांबवून त्याच्या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. आमिरचा मित्र अमीन लवकरचं एका दिग्दर्शकाच्या रूपात बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याने त्याच्या डेब्यू चित्रपटात आमिरला एका गाण्यावर नृत्य करण्याची विनंती केली. आमिरने मित्राची विनंती मान्य करत त्याचा आगामी चित्रपट '' चं चित्रीकरण थांबवलं आणि गाण्याचं चित्रीकरण आधी पूर्ण केलं. या गाण्यासाठी आमिरने त्याच्या आधीच ठरलेल्या वेळापत्रकातून वेळ काढल्याने अमीनने त्याचे आभार मानले. या गाण्यात आमिर एका हटके अंदाजात दिसणार आहे. या गाण्याचं चित्रीकरण जयपूरला झालं असून गाण्यात आमिरसोबत अभिनेत्री एली अवरामदेखील दिसणार आहे. यात आमिरचा लूक अत्यंत वेगळा असून तो अगदी शांत आणि बेफिकीर पात्र साकारत आहे. या गाण्यातील आमिरचा पोशाख स्वतः आमिरने तयार केला असून त्याने निरनिराळ्या कल्पना लढवत या पात्राला वेगळं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. 'आमिरवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी विचारणा करताच कोणताही विचार न करता त्याने होकार दिला', असं अमीनने सांगितलं. चित्रीकरणादरम्यान गाण्याच्या संपूर्ण टीमने प्रचंड धमाल मस्ती केली असून सगळेच या गाण्यासाठी उत्साही आहेत. लवकरचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.