अमरावती: स्फोटक वाहतूक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

अमरावती: स्फोटक वाहतूक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

https://ift.tt/3s32bVk
अमरावती: येथे स्फोटके सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. यात तिवसा पोलीसांनी सातरगाव येथील सुमित सोनोने याला अटक करून, काल न्यायलायात हजर केले होते. न्यायलायाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. तर या प्रकरणात आरोपी अंकुश लांडगे व कमलेश दापूरकर (दोन्ही रा. करजगांव) यांना पोलिसांनी काल रात्री उशिरा गावातून अटक केली आहे. विहिरीच्या खोदकामाकरिता वापरण्यात येत असलेल्या जिलेटिन स्फोटकाची खरेदी व देवाणघेवाणीच्या माध्यमातून सातरगाव येथील सोनोने याने व्यवहार केला होता. तिवसा येथून स्फोटके घेऊन जात असताना रात्रीच्या वेळेला पंचवटी चौकात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीवर असलेल्या लोकांचा पाठलाग केला होता. तेव्हा तिवसा पोलिसांनी याची चौकशी केली असता, सुमित सोनोने याचे नाव समोर आले. चौकशी केली असता, या प्रकरणात अंकुश मोहन लांडगे व कमलेश नंदकिशोर दापूरकर हे सोनोने याच्याकडून स्फोटके खरेदी करून घेऊन जात होते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे या दोघांनाही तिवसा पोलीसांनी गावातून अटक केली आहे. यातील सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींना अमरावती न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिवसा पोलीस पुढील तपास करत आहेत.