करोनाबाधित आझम खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

करोनाबाधित आझम खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवलं

https://ift.tt/33tKS55
लखनऊ : समाजवादी पक्षाचे खासदार यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी ते असल्याचं समोर आलं होतं. आझम खान यांच्यासोबत त्यांचे पुत्र अब्दुल्लाह आझम यांनादेखील रुग्णालयात हलवण्यात आलंय. अब्दुल्लाह खान हेदेखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासहीत आझम खान यांना अॅम्ब्युलन्सद्वारे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आझम खान यांना रुग्णालयात कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आलाय. आझम खान हे उत्तर प्रदेशच्या सीतापूर तुरुंगात बंद होते. सीतापूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या एका टीमनं रविवारी सायकाळी आझम खान यांच्या प्रकृतीची पडताळणी केली आणि आपला अहवाल दिला. त्यानंतर तुरुंग आणि जिल्हा प्रशासनानं योग्य उपचारांसाठी आझम खान यांना बाहेर नेण्यास परवानगी दिली. आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्लाह आझम गेल्या आठवड्यात करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते. कोविड चाचणीत ते करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. यापूर्वी सरकारनं त्यांना चांगल्या उपचारांसाठी लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजला नेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कथितरित्या त्यांनी सीतापूर तुरुंगातून बाहेर जाण्यास नकार दिला. आझम खान यांच्याविरुद्ध ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे ते तुरुंगात आहेत. आझम खान यांच्यासोबत तुरुंगात बंद असलेले आणखीन १३ कैदीही करोनाच्या तावडीत सापडले आहेत.