अमेरिकेच्या इंधन पुरवठा यंत्रणेवर मोठा सायबर हल्ला; आणीबाणी जाहीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

अमेरिकेच्या इंधन पुरवठा यंत्रणेवर मोठा सायबर हल्ला; आणीबाणी जाहीर

https://ift.tt/2SI5ULr
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या सर्वात मोठ्या इंधन पाइपलाइनवर सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. करोना महासाथीच्या आजाराचा फायदा हॅकर्सने घेतला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोनामुळे या पाइपलाइनशी संबंधित अभियंते घरातूनच काम करत आहेत. अमेरिकेतील कोलोनियल पाइपलाइनच्या माध्यमातून दररोज २५ लाख बॅरल तेल दिले जाते. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांमध्ये डिझेल, गॅस आणि जेट इंधनाचा ४५ टक्के पुरवठा याच पाइपलाइनमधून होतो. पाइपलाइन शुक्रवारी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला. त्यानंतर आता पाइपलाइनद्वारे होणारा इंधन पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाचा: वाचा: आणीबाणी जाहीर केल्याने काय होणार? आणीबाणी जाहीर केल्यामुळे इंधन पुरवठा रस्त्यांच्या मार्गे करता येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक ठिकाणी इंधन पुरवठा सुरळीत राहू शकतो. आणीबाणीच्या घोषणेमुळे इंधन पुरवठा बाधित झालेल्या राज्यांपर्यंत इंधन वाहतूक करण्याची परवानगी मिळते. अलाबामा, अर्कान्सा, कोलंबिया, डेलावेर, फ्लोरिडा, जॉर्जिया, केंटकी, लुईझियाना, मेरीलँड, मिसिसिप्पी, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वेनिया, दक्षिण कॅरोलिना, टेनेसी, टेक्सास आणि व्हर्जिनिया आदी राज्यांमध्ये रस्ते मार्गे इंधन पुरवठा करण्यात येणार आहे. वाचा: वाचा: रॅन्समवेअर हल्ल्यानंतर रविवारी अमेरिकेत गॅसच्या किंमती वाढल्या. लवकरच पाइपलाइन पुन्हा सुरू न केल्यास किंमती आणखी चढू शकतील असा विश्लेषकांनी इशारा दिला आहे. तेलाच्या किंमती सोमवारी एक टक्क्याहून अधिक वाढल्या. रॅन्समवेअर हल्ल्यामुळे संगणकीय प्रणालीला हॅक करण्यात आले आणि ऑपरेटरर्सकडून पैशांची मागणी करण्यात आली होती, असे म्हटले जात आहे.