
माद्रिद: एका क्रूर, नरधाम या शब्दांना लाज आणेल असे कृत्य समोर आले आहे. एका मुलाने आपल्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे हजार तुकडे केले. इतकंच नव्हे तर त्याने हे मांस स्वत: भक्षण केले आणि श्वानांनाही खाण्यास दिले. आईच्या शरिराचे तुकडे करून मांस फ्रिजमध्ये ठेवले होते. त्यानंतर दोन आठवड्यापर्यंत तो हे मांस खात होता. स्पेनच्या कोर्टाने या प्रकरणी आरोपी साचेज गोमेज याला आई मारिया सोलेदाद हिच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. ही क्रूर, अमानवीय घटना फेब्रुवारी २०१९ मध्ये घडली होती. कोर्टाने या प्रकरणी गोमेजला हत्या प्रकरणात दोषी ठरवले. नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने गोमेजला दोषी ठरवले. गोमेज हा मनोरुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने हा दावा फेटाळून लावला. गोमेजने गळा दाबून आईची हत्या केली होती. वाचा: आईचा मृत्यू झाला असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने मृतदेहाचे हजार तुकडे केले आणि दोन आठवड्यापर्यंत तो खात होता. पोलिसांनी तपासा दरम्यान त्याला अटक केली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोमेजने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. तर, ड्ऱॉव्हरमध्ये त्याने हाडे लपवून ठेवले होते. मारियाचे शीर, हात आणि हृदय तिच्या बेडरुममध्ये आढळले. वाचा: वाचा: दरम्यान, कोर्टात सुनावणी दरम्यान गोमेजने दावा केला की, टीव्ही पाहत असताना त्याच्या आईला ठार मारण्याचा एक गुप्त संदेश मिळाला. त्यातून त्याने हे कृत्य केले. सरकारी पक्षाने गोमेजला १५ वर्ष आणि पाच महिन्यांच्या शिक्षेची मागणी केली आहे. कोर्टाने अद्याप शिक्षेबाबत कोणताही निर्णय दिला नाही.