'कोविड वॉररुम'मध्ये जाऊन तेजस्वी सूर्या यांनी मागितली जाहीर माफी! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 7, 2021

'कोविड वॉररुम'मध्ये जाऊन तेजस्वी सूर्या यांनी मागितली जाहीर माफी!

https://ift.tt/3utYh94
नवी दिल्ली : कर्नाटकात रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी लाखोंच्या घरात पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला होता. या घोटाळ्यासाठी सात जणांना अटक करण्यात आलीय. या घोटाळ्या दरम्यान सत्ताधारी भाजपचे खासदार आणि आमदारांनी या प्रकरणाला '' फासण्याचाही प्रयत्न केल्याचं केल्याचंही समोर आलं. यानंतर, भाजपचे बंगळुरू दक्षिणचे खासदार यांनी गुरुवारी स्वत: बंगळुरू दक्षिणच्या कोविड वॉर रुममध्ये जाऊन इथं काम करणाऱ्या २०० कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. ( to Covid War Room Workers) तेजस्वी सूर्या ४ मे रोजी वॉररुममध्ये पोहचले होते. या वॉररुममध्ये काम करणाऱ्या १६ मुस्लीम व्यक्तींच्या नावं घेत त्यांच्यावर बेड घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सूर्या यांनी केला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या नावासहीत फोन क्रमांक सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनेक धमक्यांना आणि आरोपांचा सामना करावा लागला. प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर तेजस्वी सूर्या यांनी आपली चूक कबूल केलीय. आपल्याला एक यादी देण्यात आली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा आपला कोणताही प्रयत्न नव्हता. त्यावेळी ही सगळी नावं एकाच समुदायाशी निगडीत आहेत, हेदेखील आपल्या ध्यानीमनी आलं नाही. ही नावं हिंदू आहेत की मुस्लीम हेदेखील आपण पाहिलं नाही, असं स्पष्टीकरण तेजस्वी सूर्या यांनी वॉररुमची माफी मागताना दिलंय. मुख्यमंत्र्यांविरोधात कट? कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी तेजस्वी सूर्या यांच्यासहीत दोन आमदारांविरुद्ध आरोपांच्या चौकशी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री तेजस्वी सूर्या आणि आमदार सतीश रेड्डी यांच्यावर नाराज असल्याचंही समोर येतंय. बोम्मनाहल्ली मतदारसंघाचे आमदार सतीश रेड्डी यांच्याशीही मुख्यमंत्र्यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. पक्षातूनच आपल्याविरुद्ध कट रचला जात असल्याचाही संशय मुख्यमंत्र्यांना असल्याचं समजतंय.