पुण्यात कडक लॉकडाऊन? अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 7, 2021

पुण्यात कडक लॉकडाऊन? अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक

https://ift.tt/33mIwoF
: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री () यांच्या उपस्थितीत पुण्यात आज एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुण्यात कडक लॉकडाऊनचा विचार करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत शहरात पूर्णपणे ( in ) करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या या बैठकीला अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, तसंच पुणे शहराचे महापौर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून हायकोर्टाने चिंता व्यक्त केली होती. तसंच करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊनचा विचार करावा, असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. शहरात खरंच पूर्णपणे लॉकडाऊन होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी निर्बंध लादल्यानंतर व्यापारी वर्गाकडून मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे उद्योग-धंद्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे करोनाचं संकट गडद होत असतानाही सरकारने कडक लॉकडाऊन करणं आतापर्यंत टाळलं आहे. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेला अनेक दिवस लोटल्यानंतर रुग्णांची संख्या फारशी कमी होत असल्याने सरकारकडून कडक लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो. पुण्यात अजूनही अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तर संभाव्य लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी करायची, याबाबतही चर्चा होऊ शकते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.