अंत्यविधीला नेलेल्या आजींनी उघडले डोळे आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 12, 2021

अंत्यविधीला नेलेल्या आजींनी उघडले डोळे आणि...

https://ift.tt/2R37O8V
बारामती: घरीच विलगीकरणामध्ये असलेल्या करोनाबाधित आजींचे निधन झाल्याचे समजून त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना अचानक त्यांनी डोळे उघडल्याचा प्रकार मुढाळे (ता. बारामती) गावात सोमवारी घडला. त्यामुळे कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आणि पुढील अनर्थ टळला. मुढाळे येथे ७६ वर्षांच्या आजींना २० दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरू होते. त्यांना हालचाल करता येत नव्हती. गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिक खालावली. आजीबाई डोळेसुद्धा उघडत नव्हत्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना बारामतीला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे समजून कुटुंबीयांनी घरी निधन वार्ता कळवली. त्यानंतर अंत्यसंस्कारांची तयारी झाली. त्या वेळी नातेवाइकांची आर्त हाक ऐकून आजीबाईंनी डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, या घटनेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही.