बीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त 'इतक्या' लस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

बीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त 'इतक्या' लस

https://ift.tt/3bgwem1
मुंबई : राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे अपुऱ्या लसींमुळे वातावरण आणखी तापल्याचं दिसून येत आहे. आजही मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरू असल्याचं समोर येत आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार, बीकेसी लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी टोकन दिलेल्या नागरिकांनी आज लसीसाठी गर्दी केली पण फक्त १ हजारच टोकन वाटणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. भर उन्हात मोठ्या रांगा लावूनही लसीकरण होत नसल्यामुळे नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केली. शनिवारी टोकन दिलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पण लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे बीकेसी केंद्रावर फक्त एक हजार लसी दिल्या जाणार आहेत. यावेळी टोकनचा आता काही फायदा होणार नसल्याने नागरिक चांगलेच संतापले आहे. यावेळी अनेकांनी राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, एकीकडे लसीकरणाचा गोंधळ तर दुसरीकडे करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं चित्र आहे. मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णांची दैनंदिन संख्या १० ते ११ हजारांवरुन आता थेट २ हजारांवर आली आहे. मुंबईत करोना लढ्याला यश मिळत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला होता. आता मात्र, करोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. १० ते ११ हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत २ हजार ४०३ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ३ हजार ३७५ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.