अमरावतीच्या परतवाडा शहरातील चौकात फिल्मीस्टाइल थरार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 9, 2021

अमरावतीच्या परतवाडा शहरातील चौकात फिल्मीस्टाइल थरार

https://ift.tt/2RAU30X
अमरावती: शहराच्या मुख्य चौकात जिवाच्या आकांतानं एक माणूस धावतोय... त्याच्या मागे तिघे जण धावताहेत... एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना जिल्ह्यातील शहरात नुकतीच घडली. हे दृश्य बघणाऱ्यांना सुरुवातीला काही कळलंच नाही. मात्र, त्या तिघांनी जेव्हा पुढं धावणाऱ्याला पकडलं, तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. पकडला गेलेला तो इसम हॉटेलमधील खुर्च्या, सिलिंडर व स्वयंपाकाची भांडी चोरणारा चोर असल्याचं नंतर समोर आलं. शेख इब्राहीम उर्फ इब्बू गधा शेख मोहम्मद (३२) असं या इसमाचं नाव असून तो अचलपूरच्या अकोट इथला रहिवासी आहे. अचलपूर पोलिसांनी शहरातील जयस्तंभ चौक परिसरात फिल्मीस्टाइल पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. अचानक उभा असलेला युवक का पळायला लागला आणि पाठलाग करणारे तीन व्यक्ती कोण, असा प्रश्न काही क्षण नागरिकांमध्ये उद्भवला होता. त्यातून विविध चर्चाही रंगल्या होत्या. वाचा: ठाण्याच्या हद्दीतील फौजी हॉटेलचे मालक रमेश चंदेले यांनी ३ मे रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने हॉटेलचे शटर तोडून हॉटेलमधील प्लास्टिक खुर्च्या, सिलिंडर, मिक्सर, गंज इत्यादी साहित्य चोरले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. संबंधित शेख इब्राहिम उर्फ इब्बू गधा हा शहरातील जयस्तंभ चौकात उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी इब्बू गधा याला ताब्यात घेऊन हॉटेलमधून चोरी गेलेला १६ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला. वाचा: इब्बू हा सराईत गुन्हेगार असून, परतवाडा, अंजनगाव, अचलपूर येथील अनेक घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखडे, डी. बी. स्कॉडचे पुरुषोत्तम बावनेर, विलास सोनवणे, विशाल थोरात, शेख मुजफ्फर यांनी केली. वाचा: