नवी दिल्ली : दररोज नव्याने दाखल होणारी रुग्णसंख्या आणि दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या आज मात्र खाली घसरलेली दिसतेय. हीच काय ती दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी (१० मे २०२१) ३ लाख २९ हजार ९४२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५६ हजार ०८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ३८७६ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी २९ लाख ९२ हजार ५१७ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ४९ हजार ९९२ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख १५ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी २९ लाख ९२ हजार ५१७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४
- उपचार सुरू : ३७ लाख १५ हजार २२१
- एकूण मृत्यू : २ लाख ४९ हजार ९९२
- करोना लसीचे डोस दिले गेले : १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६