व्हिक्टोरिया: जगात सर्वाधिक लसीकरण झालेला आफ्रिकन देश सध्या चर्चेत आहे. सेशेल्समध्ये अचानकपणे करोनाबाधितांची संख्या दुप्पटीने वाढल्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत. करोनाबाधितांच्या या वाढत्या संख्येमुळे जगातील काही ठिकाणी विषाणूला अटकाव करण्यासाठी लस प्रभावी ठरत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. सेशेल्समधील करोनाबाधितांच्या आकडेवारीची समीक्षा करण्यात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या आधी सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात करोनाची बाधा झालेल्यांपैकी एक तृतीयांश जणांना करोनाची दोन्ही डोस देण्यात आले होते. सेशेल्समध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वाधिक लसीकरण झाले आहे. कोणत्या लशीच्या व्यापक समीक्षेशिवाय ती लस कमी प्रभावी आहे, असे म्हटले जाऊ शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वाचा: जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी केट ओ ब्रायन यांनी म्हटले की, आम्ही सेशेल्स सरकारच्या संपर्कात आहोत. व्यापक समीक्षेदरम्यान विषाणूच्या स्ट्रेनबाबत आणि बाधितांची संख्या याबाबत गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार करोनाबाधितांची संख्या मागील आठवड्यात २४८६ झाली होती. वाचाा: बाधित असलेल्या २४८६ जणांपैकी ३७ टक्के जणांना करोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. सेशेल्समध्ये ५७ टक्के जणांना चीनची सायनोफार्म लस देण्यात आली. तर, उर्वरित जणांना भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड लस देण्यात आली. वाचा: करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी करोना लस घेतलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. ज्या बाधितांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, त्यांना करोना लस देण्यात आली नव्हती.