कोलकाता: जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी रविवारी दिली. टीम इंडिया या दौऱ्यात मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू असणार नाहीत असे, गांगुलीने सांगितले. वाचा- भारतीय संघ जेव्हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल तेव्हा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा सारखे स्टार खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असतील. तेथे ते इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत असतील. त्यामुळेच विराट आणि रोहितसह अनेक खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यावर असणार नाहीत. वाचा- आम्ही () जुलै महिन्यात वरिष्ठ खेळाडूंची मालिका खेळवण्याचा विचार करत आहोत. हा संघ श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिका खेळले. भारताचे दोन वेगवेगळे संघ असतील का या प्रश्नावर गांगुली म्हणाला, श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणारा आणि मर्यादीत षटकांची मालिका खेळणार संघ तसेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणारा संघ वेगवेगळा असेल. तो संघ पांढऱ्या चेंडूने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचा असेल. तर इंग्लंडमध्ये वेगळा संघ असेल. वाचा- यासाठी बीसीसीआयने मर्यादित षटकांच्या संघात जे खेळाडू नियमीतपणे वनडे आणि टी-२० खेळत आहेत त्यांचा विचार केला जाईल. श्रीलंकेच्या दौर्यात कमीत कमी ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर शिल्लक कालावधीत आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरीत ३१ लढती खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. वाचा- शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि युजवेंद्र चहल या खेळाडूंनी दौऱ्यासाठी तयार रहावे असे बीसीसीआयचे मत आहे.