तडजोड करणाऱ्यातली नाही साई पल्लवी, नाकारली कोट्यवधींची ऑफर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 10, 2021

तडजोड करणाऱ्यातली नाही साई पल्लवी, नाकारली कोट्यवधींची ऑफर

https://ift.tt/3bfVJ78
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचा काल २९ वा वाढदिवस होता. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच की काय तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. तिनं 'प्रेमम' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती आणि तिचा पहिलाच चित्रपट हिट झाला. आज साई पल्लवीच्या आयुष्याबद्दल फारशा माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात... साई पल्लवीला अभिनयाच्या क्षेत्रात कधीच यायचं नव्हतं. तिच्याकडे मेडिकलची डिग्री आहे. जर साई अभिनेत्री झाली नसती तर ती एक कार्डियोलॉजिस्ट झाली असती. २०१४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिला 'प्रेमम'मधील 'मलार'च्या भूमिकेची ऑफर मिळाली. या चित्रपटासाठी तिनं साऊथचा फिल्मफेअरही जिंकला. त्यानंतर तिला मल्याळम चित्रपट 'काली'ची ऑफर मिळाली. साईच्या पहिल्या चित्रपटाला उत्तम यश मिळालं होतं. तिनं हा चित्रपटही स्वीकारला. एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. पण तिनं नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. आतापर्यंत साई पल्लवीनं १५ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साई पल्लवीचं एक विशेष म्हणजे ती कोणत्याही चित्रपटात मेकअप न करताच भूमिका साकारते. याच कारणामुळे ती प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. तिच्या सोशल मीडियावरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. साईनं काही वर्षांपूर्वीच कोट्यवधीची जाहिरात नाकारली होती. ज्यामुळे तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. साई पल्लवीला दोन कोटी रुपयांची एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती. यावेळी साईनं सौंदर्यप्रसाधनांना नापसंती दर्शवत, 'सुंदर दिसण्यासाठी मी मेकअपचा वापर करत नाही तर मग ज्या गोष्टी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतात अशा कोणत्याही प्रमोशनमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही' असं तिनं सांगितलं होतं. साई पल्लवीच्या मते जे नैसर्गिक आहे तेच खूप सुंदर आहे.