बापरे! मुंबईत म्युकरमायकोसिसचे आढळले १११ रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 13, 2021

बापरे! मुंबईत म्युकरमायकोसिसचे आढळले १११ रुग्ण

https://ift.tt/3bn83Tf
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई कोविडनंतर होणाऱ्या '' या आजाराचे मुंबईत १११ रुग्ण आढळले आहेत. यात सायन रुग्णालयात ३२, केईएम ३४, नायर ३८ आणि कूपर रुग्णालयात सात जणांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. हा आजार बुरशीजन्य असला, तरी संसर्गजन्य असल्याचे आढळून आले नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली आहे. करोनातून बरे झाल्यावर काही रुग्ण 'म्युकरमायकोसिस' या आजाराने त्रस्त आहेत. या रोगावर उपचार करण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का, हा रोग नियंत्रणात राहावा यासाठी पालिकेने कोणती उपाययोजना हाती घेतली आहे, याची सविस्तर माहिती सादर करावी, असा हरकतीचा मुद्दा बुधवारी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. कोविडचे उपचार सुरू असताना, म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारामध्ये कान, नाक, घसा आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होत आहे. म्युकरमायकोसिसवर देण्यात येणारी इंजेक्शन आणि उपचार पद्धती महागडी आहे, असे शिंदे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी या आजाराबद्दल स्पष्टीकरण दिले. या रोगाबद्दल रुग्णालयांमधील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार केला आहे. आजार होऊ नये यासाठीची काळजी, झाल्यास उपचारपद्धती, उपकरणे, औषधे याबाबत प्रोटोकॉल निश्चित केलेला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे. रोग टाळण्यासाठी उपाययोजनांची खबरदारी, माहिती सर्व रुग्णालय प्रशासनांना दिली आहे, असे काकाणी यांनी सांगितले. औषध खरेदीची प्रक्रिया सुरू कोविड उपचारपद्धतीत स्टेरॉइड आणि टॉसिलीझुमॅबचा अतिवापर टाळावा, विशेषतः मधुमेही रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावर वापरण्यात येणारी 'एम्फो टेरेसीन बी' ही इंजेक्शन व अन्य औषधे यांची खरेदी करण्यासाठी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरू केली आहे. तोपर्यंत रुग्णालय व्यवस्थापनांना स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांना आठ ते १२ आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.