सनी लिओनीने मागितली मदत, म्हणाली- या मुलांना शोधा आणि.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 12, 2021

सनी लिओनीने मागितली मदत, म्हणाली- या मुलांना शोधा आणि..

https://ift.tt/2Szh6cX
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तिच्या सौंदर्याने कित्येकांना घायाळ करते. तिला पाहण्यासाठी चाहतेही धडपडत असतात. सनीच्या एका लुकने चाहत्यांच्या काळजाचं अगदी पाणी पाणी होऊन जातं. अशात अचानक एक दिवस सनी तुमच्या समोर येऊन उभी राहिली तर तुम्ही काय कराल? असंच काहीसं केरळमधल्या मुलांसोबत झालं आणि त्यांनी जे केलं ते पाहून सनीने चक्क चाहत्यांकडे त्या मुलांना शोधण्याचं आवाहन केलं. सध्या सनी तिच्या पती आणि मुलांसोबत केरळमध्ये आहे. केरळमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सनी एका बोटीने समुद्र सफरीसाठी गेली. या सफरी दरम्यान सनीला एक आगळा वेगळा अनुभव आला. समुद्रात असताना सनीच्या बोटीशेजारी एक छोटी होडी आली आणि त्या होडीमधील मुलांनी जेव्हा सनीला पाहिलं तेव्हा ते सनीला चिअर करण्यासाठी ओरडू लागले. अचानक सनी त्यांच्या समोर आल्याने सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि ते सगळे सनीचं नाव घेत तिचे फोटो काढू लागले. या घटनेनंतर सनीने त्यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत चाहत्यांकडे मदत मागितली आहे. तिने लिहिलं, 'हा फोटो व्हायरल करा आणि या प्रेमळ चाहत्यांना शोधण्यासाठी माझी मदत करा जेणेकरून मी त्यांना भेटू शकेन.' अभिनेत्रीच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तर कित्येकांनी सनीचं ट्विट रिट्विट करत त्या मुलांना शोधण्याचं काम सुरू केलं आहे. एका युझरने तर कमेंट करत त्या फोटोमध्ये तो स्वतः असल्याचं सांगितलं आहे. युझरने लिहिलं, 'मॅम, एक तर मीच आहे. तो जो टक्कल असलेल्या मुलाच्या मागे झाकला गेलाय तो मीच आहे. कृपया मॅम शाउट आउट द्या ना. मी या धरतीवरचा तुमचा सगळ्यात मोठा चाहता आहे.' दरम्यान, सनीने केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत मदर्स डे साजरा केलं होता आणि त्याचा एक फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला होता.