Video: कधीकाळी रिक्षावर चित्रपटाचे पोस्टर चिकटवायचा आमिर खान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 13, 2021

Video: कधीकाळी रिक्षावर चित्रपटाचे पोस्टर चिकटवायचा आमिर खान

https://ift.tt/2RSO4oc
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता लवकरच लाल सिंह चढ्ढा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून त्याच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण हा चित्रपट रिलीज कधी याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. आमिरनं आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यासाठी प्रत्येक चित्रपटाचं प्रमोशन तो हटके पद्धतीनं करताना दिसला आहे. चित्रपटांच्या प्रमोशनसाठी नेहमीच त्याच्याकडे हटके आयडिया असतात. त्यामुळे की काय त्याचे चित्रपट हिटही होतात. करिअरच्या सुरुवातीला जेव्हा आमिर खानचा हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळीही आमिर अगदी हटके पद्धतीनं चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. त्यावेळी आमिर फार चित्रपटात झळकला नव्हता त्यामुळे त्याला कोणी फारसं ओळखत नव्हत असं असताना चित्रपटाचं प्रमोशन करणं थोड कठीणच काम होतं. पण त्यावरही आमिरनं एक हटके आयडिया शोधली होती. त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आमिर चित्रपटाचे पोस्टर वेगवेगळ्या रिक्षांवर चिकटवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आमिर खान निळ्या रंगाच्या स्लीव्हलेस शर्टमध्ये हातात पोस्टर घेऊन असलेला दिसत आहे. या व्हिडीओध्ये त्याच्यासोबत त्याचे मित्र आणि सहकलाकार राज जुत्शीसुद्धा दिसत आहे. दोघंही रिक्षावाल्यांना थांबवून त्यांना आपल्या चित्रपटाचं पोस्टर त्यांच्या रिक्षावर चिटकवण्यासाठी परवानगी मागत असताना दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राउंडला आमिर खान म्हणतो, 'जुत्शी, मी, मन्सूर आणि त्यांची बहीण नुजहत आम्ही सर्व रस्तावरून फिरत होतो. रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना थांबवून त्यांना विनंती करत होतो की, हे पोस्टर चिटकवा. आमचा चित्रपट रिलीज होणार आहे. काही लोक आम्हाला ओळखत होते ते तयार होत असत. तर काहींना अजिबात माहीत नव्हतं अशा वेळेस ते विचारायचे कोणता चित्रपट आहे हा? हिरो कोण आहे? कोण आमिर खान? तेव्हा मी म्हणायचो की मीच आमिर खान आहे. त्यावेळी लोकांनी आमच्या चित्रपटाविषयी जाणून घ्यावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न करायचो.' आमिर खाननं 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री हिची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालला आणि आमिर रातोरात स्टार झाला. त्यानंतर त्यानं करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिलं नाही.