करोनाचे थैमान: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 2, 2021

करोनाचे थैमान: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी

https://ift.tt/3tcx1L5
जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने मॉडर्नाच्या लशीला मंजुरी दिली आहे. मॉडर्नाची लस आपात्कालीन परिस्थितीत वापराची मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत एस्ट्राजेनका, फायजर-बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सच्या लशीला आपात्कालीन परिस्थितीतील वापरासाठी मंजुरी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, आगामी काही दिवसांमध्ये सिमोफार्मा आणि सिनोवॅक या लशींनाही अशाच प्रकारची मंजुरी देण्यात येणार आहे. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी लशीला मंजुरी देण्यात आली. कंपनीच्यावतीने जागतिक आरोग्य संघटनेला आकडेवारी उपलब्ध करून देण्यास उशीर झाला असल्याचे सीईओ स्टिफन बानसेल यांनी म्हटले. वाचा: जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली मॉडर्ना ही पाचवी लस ठरली आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने डिसेंबर २०२० मध्ये मॉडर्नाच्या लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापरण्याची परवानगी दिली होती. मॉडर्नाची लस एमएनआरए आधारीत लस आहे. चाचणीमध्ये ही लस ९४ टक्के प्रभावी आढळली होती. वाचा: वाचा: दरम्यान, भारतात रशियाने विकसित केलेली 'स्पुटनिक व्ही' लस दाखल झाली आहे. लशीची पहिली खेप दाखल झाल्यामुळे भारतातील लसीकरणाला काही प्रमाणात वेग येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 'स्पुटनिक व्ही' ही भारतातील पहिली परदेशी ठरणार आहे. स्पुटनिक लशीचे उत्पादन भारतातही करण्यात येणार आहे. जगभरातील देशांमध्ये करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. भारतात करोनाची दुसरी लाट आली असताना ब्राझीलमध्ये ही करोनाचे थैमान सुरू आहे. ब्राझीलमध्ये एकाच महिन्यात तब्बल एक लाख बळींची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये आता एकूण बळींची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. जगात सर्वाधिक करोना बळींची नोंद अमेरिकेत झाली असून ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमधील परिस्थिती आणखी चिघळणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.