
नवी दिल्ली: जश जशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तारीख जवळ येत आहे तस तशी चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. चॅम्पियशिपच्या अंतिम लढतील पोहोचलेला न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला होता. त्यानंतर भारताने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी काढली. वाचा- इंग्लंडमधील साउथहँप्टन येथे १८ ते २२ जून या दरम्यान ही फायनल होणार आहे. ही लढत स्पोटिंग विकेटवर होणार असल्याने सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता अधिक आहे. पण जर सामना टाय झाला किंवा ड्रॉ झाला तर कोणता संघ चॅम्पियन होणार. काय होणार जर फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर? आयसीसीच्या नियमानुसार २३ जून हा दिवस फायनल मॅचसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. १८ ते २२ जून या काळात होणारी अंतिम मॅच जर टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद मिळेल. कसोटी क्रिकेटमध्ये खेळासाठी एकूण ३० तासांचा कालावधी उपलब्ध करून दिलाय. वाचा- राखीव दिवस कधी वापरला जाईल कसोटी सामन्यातील नियमीत दिवसात काही कारणामुळे वेळ वाया गेला तर आणि त्याची भरपाई त्याच दिवशी झाली नाही तर सामना सहाव्या दिवशी खेळवला जाईल. उदा- पावसामुळे किंवा इन्य कोणत्या कारणामुळे एक तासाचा खेळ झाला नाही. या वाया गेलेला एक तास त्याच दिवशी भरून काढला गेला तर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असे मानले जाणार नाही. पण जर पावसामुळे एक दिवस वाया केला आणि अन्य चार दिवसात कमी तासांचा खेळ झाला तर राखीव दिवशी सामना खेळवला जाणार. वाचा- कधी रवाना होणार टीम इंडिया भारतीय संघातील खेळाडू १९ मे रोजी मुंबईत बायो बबलमध्ये प्रवेश करतील. आठ दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर ते इंग्लंडमध्ये जातील तेथे त्यांना १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले. बीसीसीआयने या मोठ्या दौऱ्यात खेळाडूंना कुटुंबाला सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. भारतीय संघ २ जून ते १४ सप्टेंबर म्हणजे ३ महिने इंग्लंडमध्ये राहणार आहे. यामुळे हा निर्णय घेतला गेला. भारतीय खेळाडू आप आपल्या शहरात करोनाची लस घेत आहेत. त्यांना दुसरी लस इंग्लंडमध्ये दिली जाईल.