जम्मू काश्मीर : 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीनला कंठस्नान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 7, 2021

जम्मू काश्मीर : 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीनला कंठस्नान

https://ift.tt/3xmvmFH
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याचं समोर येतंय. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत दहशतवाद्याला ठार केलंय. काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक असलेल्या मेहराजुद्दीन हलवाई याला ठार करण्यात आलंय. मंगळवारी रात्री उशिरा हंदवाडाच्या क्रालगुंडच्या पाजीपोरा-रेनान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेच्या ३२ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची ९२ बटालियनची एक संयुक्त टीम या भागातील मोहिमेत सहभागी झाली होती. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून हे ऑपरेशन हाती घेण्यात आलं होतं. उत्तर काश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलंय. मेहराजुद्दीन याचा खोऱ्यात अशांतता पसरवण्यात तसंच अनेक दहशतवादी कारवायांत थेट सहभाग होता.