विधानसध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 7, 2021

विधानसध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन

https://ift.tt/3hG3xl5
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पावसाळी अधिवेशनात रखडली असली तरी त्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार असल्याचे समजते. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होते. मागील अधिवेशन अध्यक्षाविनाच पार पडले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी पुढे आली. परंतु, पावसाळी अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. मात्र आता हिवाळी अधिवेशनापूर्वी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे समजते. अधिवेशनाच्या पूर्वीच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असे पत्र ठाकरे सरकारला पाठवले असून राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत असल्याबाबतची चर्चा झाली. त्यामुळेच राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णयही समन्वय समितीच्या बैठकीत झाल्याचे समजते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री ठाकरे आत्ता अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या बाजूने नव्हते. त्यात महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळेही हा निर्णय टाळण्यात आल्याचे समजते.